बोरीवलीतील बंगला सोडण्यासाठी धमकी, राधे माँवर नवा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2016 06:21 PM (IST)
मुंबई: स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण शारीरिक छळ प्रकरणानंतर आता मनमोहन गुप्ता यांना धमकी दिल्याचा आरोप राधे माँवर लावण्यात आला आहे. मुंबईतील प्रसिद्धी एमएम मिठाई दुकानाचे मालक मनमोहन गुप्ता यांना बोरिवलीतील घर सोडण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. 2015 साली राधे माँवर शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर गुप्ता यांनी राधे माँला घरातून हाकलून दिले. मात्र, त्यावेळी मनमोहन गुप्ता यांचा मुलगा आणि भाऊही राधे माँ सोबत घराबाहेर गेले. बोरिवलीच्या घरावर राधे माँचा डोळा असून ते हडप करण्याचा प्रयत्नात असल्याचा आरोपी मनमोहन गुप्ता यांनी केला आहे.