नवी दिल्ली : केंद्र सरकारने हवाई दलाचा योग्य पद्धतीने वापर केला असता तर आज पाकव्याप्त काश्मीरही भारताच्या ताब्यात असता असं परखड मत भारतीय हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा यांनी मांडलं आहे.


 

 

भारताने काश्मीर प्रश्नावर नैतिकतेची भूमिका न घेता लष्करी पद्धतीने तोडगा काढायला हवा होता 1971 च्या युद्धापर्यंत सत्ताधाऱ्यांनी भारतीय हवाई दलाच्या बलस्थानांचा योग्य पद्धतीने वापरच केला नाही. अन्यथा आज पाकव्याप्त काश्मीर हे भारतातच असतं, असंही राहा एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात म्हणाले.

 
पाकव्याप्त काश्मीर हा आजही आमच्यासाठी घशात अडकलेल्या काट्याप्रमाणे असल्याचं अरुप राहा यांनी म्हटलं. भारताने स्वतःच्या सुरक्षेसाठी व्यावहारिक दृष्टीकोन दाखवलाच नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शत्रूंवर नियंत्रण मिळवण्यात किंवा संघर्ष रोखण्यासाठी भारताने कधीच हवाई दलाचा वापर केला नाही, अशी खंतही राहा यांनी व्यक्त केली.