Yugendra Pawar, Baramati : "बारामतीत दहशतीचा आणि वेगळ्या प्रकारचे राजकारण असेल तर माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो", असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याविरोधात सख्ख्या पुतण्यानेचं म्हणजेच युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी दंड थोपटले आहेत. युगेंद्र पवारांनी (Yugendra Pawar) खासदार सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) प्रचारार्थ गावभेट दौरे सुरु केले आहेत. उंडवडीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. 


सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या गटासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची चर्चा सध्या बारामती सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवारांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे.  बारामतीत वेगळ्या प्रकारचं राजकारण होत आहे. बारामतीकरांनी असे दहशतीचं राजकारण कधी बघितलं नाही. कोणी तुम्हाला फोन करून धमकावले जात असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा, पुढचं मी बघतो, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. 


सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ युगेंद्र पवार मैदानात 


बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळणार आहे. अजित पवार गटाकडून बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवार देण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे मैदानात उतरणार आहेत. दरम्यान, अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत.


गेल्या महिन्यापासून युगेंद्र पवार चर्चेत 


युगेंद्र पवार यापूर्वी कधीही राजकारणात सक्रिय नव्हते. शिवाय, त्यांच्या नावाच्या चर्चा देखील पाहायला मिळत नव्हत्या. मात्र, शरद पवार समवेत एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर ते चर्चेत आले. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या आणि आता ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खजिनदार आहेत.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं. तर शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह आणि 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' हे नाव दिलं. त्यामुळे दोन गट तर पडलेच. मात्र, पवार कुटुंबातील महिलांमध्येच लोकसभेच्या निवडणुकीसाठी चूरस पाहायला मिळणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Baramati Lok Sabha Constituency : युगेंद्र पवार काकाची साथ सोडून आत्याच्या प्रचारासाठी मैदानात; बारामतीत राजकीय वातावरण तापलं