पुणे : तुरीचे पैसे दिले नाहीत म्हणून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज बाजार समितीमध्ये राडा घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करुन, कर्मचाऱ्यांना मारहाण ही केली.


यंदा राज्यात तुरीचे उत्पादन विक्रमी झाल्याने सरकारमार्फत तुरीची खरेदी करण्यात आली. पुण्यातील महाफार्मर्स प्रोड्यूसरने जानेवारीत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांकडून 50 लाख किमतीची तुर खरेदी केली. पण याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत.

याची दाद मागण्यासाठी गेलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही बाजार समितीच्या संचालकांकडूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी बाजार समिती परिसरात तुफान राडा घातला. यावेळी महाफार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची तोडफोड करुन काही कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली.