Priti Maske Record News: दोन मुलांची आई असलेल्या पुण्याच्या प्रिती मस्के या 45 वर्षीय महिलेने सायकलवरुन नवा रेकॉर्ड रचला आहे. लेह ते मनाली असं  428 किलोमीटरचं अंतर 55 तास 13 मिनीटांत सायकल चालवत पुर्ण करणारी भारताची पहिली महिला ठरल्या आहेत. त्यांच्या या कार्याचा फक्त भारतात पहिली महिला नाही तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील याची नोंद झाली आहे. लवकरच त्यांंना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. 


साधारण 17,582 फुट उंचीवर सायकलचा प्रवास केला. लेह ते मनाली हायवेचा सगळ्यात उंच भागात देखील त्यांनी उत्तमरित्या प्रवास केला. उंच आणि खडकाळ क्षेत्रात त्यांना सलग सायकल चालवावी लागली. या प्रवासात त्यांना दोन वेळा ऑक्सिजनची कमतरता जाणवली त्यावेळी न घाबता त्यांनी प्रवास सुरु ठेवला.  22 जूनला मुख्य अभियंता ब्रिगेडियर असलेल्या गोरव कार्की प्रितीच्या प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर 24 जूनला प्रिती यांनी हा प्रवास पुर्ण केला.


कसा होता हा अदभूत प्रवास
लेह आणि मनाली असा प्रवास करणं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र यातले काहीच लोक ते स्वप्न पुर्ण करु शकतात.  त्या परिसरातील वातावरण आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने अनेकांना हा प्रवास शक्य होत नाही. लेह- मनाली हा हायवे फार खडतर प्रवास असतो. ज्यात अनेक कठीण वळणं आणि डोंगरं आहेत. या प्रवास पर्टकांसाठी कायम कठीण असतो. याच दरम्यान अनेक ठिकाणी बर्फवृष्ठीसुद्धा असते. अशा वातावरणात सायकल चालवणं अत्यंत जोखमीचं काम असतं. प्रिती यांनी अत्यंत कठीण परिसर असलेल्या भागातून सायकल प्रवास केला. त्यांना वारा, ऊन, पाऊस आणि अर्थात बर्फवृष्ठी मोठ्याप्रामाणात सामना करावा लागला. 


बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची मदत
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांची टीम प्रितीच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात सोबत होती. त्यांच्या मेहनतीमुळे आणि कष्टामुळे हा प्रवास सोपा झाला. त्यांच्याकडून एक साटेलाईट फोन आणि आरोग्याबाबतच्या सुविधा पुरविल्या होत्या. प्रिती यांच्यासोबत दोन सहकारी देखील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने सोबत मदतीसाठी दिले होते, असं प्रिती सांगतात.