दगडूशेठ गणपतीच्या मंडपाचं काम करताना मजुराचा अपघात
एबीपी माझा वेब टीम | 03 Sep 2017 08:22 PM (IST)
दगडूशेठ गणपतीच्या मंडपात काम करताना उंचावरुन पड़ून राम जाधव हा मजूर गंभीर जखमी झाला आहे. काल पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली.
NEXT PREV
पुणे : दगडूशेठ गणपतीच्या मंडपात काम करताना उंचावरुन पड़ून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. काल पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली. राम जाधव असं मजुराचं नाव असून, त्याच्यावर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त यंदा दगडूशेठ गणपतीसाठी ब्रह्मणस्पती मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. विसर्जनापूर्वी हा देखावा लोकांना पाहता यावा यासाठी त्याचा काही भाग काढण्याचं काम सुरु होतं. यावेळी क्रेनच्या साहाय्यानं हा मजूर देखाव्याचा कळस हलवत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान हे काम करत असताना या मजुरानं सुरक्षेची कोणतीही साधनं वापरली नसल्याचं समोर येत आहे. घटनेचा व्हिडीओ पाहा