पुणे : कॉपी तपासण्यासाठी कपडे काढून झडती घेण्यात आली, असा आरोप दहावीच्या विद्यार्थिनींनी केला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी स्कूलमधील हा प्रकार आहे. याप्रकरणी दोन महिला सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कॉपी तपासण्यासाठी शाळेतील महिला सुरक्षा रक्षक सुपरवायझर आणि एका महिला कर्मचाऱ्याने मुलींना दुसऱ्या खोलीत नेऊन त्यांची तपासणी केली. यासाठी कपडे काढायला लावले, असा आरोप मुलींनी केला.

संतप्त पालकांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत या सर्व प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जानकी पाठक आणि आशा पाटील अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

शाळेचं स्पष्टीकरण

ज्या प्रकाराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला, तो तीन दिवसांपूर्वीचा प्रकार आहे. पर्यवेक्षकांच्या सांगण्यावरुनच तपासणी करण्यात आली, असं स्पष्टीकरण शाळेने दिलं आहे.

बातमीचा व्हिडीओ :