Pune Crime News: बांधकाम सुरू असलेल्या उंच इमारतीच्या 16 व्या मजल्यावरून डक्टमध्ये पडून एका महिला कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सिंहगड रोडवरील जयदेवनगर येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. मीनाकुमारी साहू असे 41 वर्षीय काम करणाऱ्या मृत महिलेचं नाव आहे नाव आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात बांधकाम साईटचे ठेकेदार शंकर भाई रेड्डी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 जुलै रोजी घडली होती त्यानंतर आता त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नक्की काय घडलं?
रेड्डी यांनी मीनाकुमारीला छत्तीसगड येथून बांधकामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी आणले होते. 16 व्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. मीनाकुमारी तिथे काम करत होत्या. रोजच्या प्रमाणे त्यांनी कामाला सुरुवात केली. यावेळी कंत्राटदाराने कोणतेही सुरक्षा उपकरण दिले नव्हते. काम करत असताना मीनाकुमार यां 16व्या मजल्यावरून डक्टमध्ये पडल्या. गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घडलेल्या प्रकारामुळे सगळ्या कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासानंतर पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. 


कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?


पुण्यात अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या इमारती बांधकाम करण्यासाठी राज्याबाहेरुन कामगार आणले जातात. त्यांच्या राहण्याची सोय केली जाते. त्यांना योग्य वेतन मिळत असल्याने अनेक कामगार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात येतात. मात्र त्यांच्यासोबत होणाऱ्या अपघातांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ठेकेदारांकडून त्यांची सगळी सोय करण्यात येते मात्र काम करायच्या ठिकाणी त्यांना सुरक्षा उपकरणं पुरवले जात नाहीत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ठेकेदाराची असते मात्र ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटनांचं प्रमाण वाढत आहे. या आधीसुद्धा येरवड्यात जाळी पडून कामगाराचा मृत्यू झाला होता. कामगारांच्या जीवाची पर्वा ठेकेदार करत नसल्याचं चित्र अनेकदा बघायला मिळालं आहे. त्यामुळे कामाराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.