बारामती : बारामती लोकसभेला (Baramati Loksabha) अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव समोर आल्यानंतर माजी मंत्री, शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवार यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांमध्ये टीकेचा प्रहार सुरुच ठेवला होता. त्यामुळे बारामतीच्या जागेवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारे यांनी अजित पवारासंह शरद पवार यांच्यावर सुद्धा घणाघाती टीका करत बारामतीमध्ये शड्डू ठोकला होता. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. 


विजय शिवतारे उद्या भूमिका स्पष्ट करणार


गेल्या पंधरा दिवसांपासून अजित पवारांवर तुटून पडलेल्या विजय शिवतारे यांना अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी बोलवून त्यांची मनधरणी केल्याची चर्चा आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोबत होते. यावेळी चर्चा झाल्यानंतर फोटोसेशन करण्यात आले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून येत होते. त्यामुळे ही चर्चा योग्य दिशेने झाली आहे की शिवतारे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत याचा फैसला आता उद्याच (29 मार्च) होणार आहे. 


भूमिका कायम ठेवणार की तलवार मॅन करणार?


विजय शिवतारे यांनी उद्या पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गेल्या 15 ते 20 दिवसांपासून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार ही भूमिका घेत अजित पवाराकडून तुटून पडलेले शिवतारेंची हीच भूमिका कायम ठेवणार की तलवार मॅन करणार याकडे जाता राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली असली, तरी विजय शिवतारे यांनी कोणत्याही स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, पुरंदरमधील समर्थक त्यांनी निवडणुकीत माघार घेऊ नये अशीच इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे एकंदरीत विजय शिवतारे हे आता काय भूमिका घेतात याची औत्सुक्य आहे. 


विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर गेल्या काही दिवसांपासून आरोपांची राळ उडवून दिल्याने बारामती लोकसभेला वातावरण चांगलंच पेटलं आहे. अजित पवार गटाकडून सुद्धा विजय शिवतारे यांना स्क्रिप्ट कोण लिहून देते याचा आम्ही शोध घेत असल्याचे म्हटलं होतं. मात्र विजय शिवतारे यांनी ते आरोप पेटवून लावत अजित पवारांवर आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या होत्या. त्यामुळे शिवतारे भूमिका काय भूमिका घेतात याकडे याची उत्सुकता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या