Sambhajiraje Chatrapati : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज जयंती राज्यामध्ये सर्वत्र उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर (Shivneri) शिवजयंतीचा (Shivjayanti 2023) मुख्य कार्यक्रम होत आहे. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित आहेत. या ठिकाणी शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र, या गर्दीमध्ये सामान्य शिवभक्तांची अडवणूक झाल्याने संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी संतप्त भावना आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या.
व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांच्या आडून कशासाठी करता? अशी थेट विचारणा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संभाजीराजे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत त्यांच्या भावना समजावून घेतल्या. ते म्हणाले की, आपल्या भावनांशी आम्ही एकरूप आहोत. आम्ही तुमच्या भावनांची आम्ही दखल घेतली आहे. राज्यातील गडकोट संवर्धन करण्याचं काम सरकारकडून नक्की केले जाईल आणि हे सर्व काम करत असताना आपल्याला विश्वासात घेतले जाईल.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चालत यावं
छत्रपती संभाजीराजेंच्या मते शासकीय शिवजंतीसाठी सामान्य शिवप्रेमींना शिवनेरी किल्ल्यावर येऊ दिलं जात नाही, त्यांना अडवून ठेवल जातं. त्याचबरोबर किल्ले रायगडावर हेलीकॉप्टरला परवानगी नाही, तर शिवनारीवर देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चालत यावं अशी संभाजीराजेनी मागणी केली.
संभाजीराजे स्टेजवर गेले नाहीत
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिवजन्माचा शासकीय सोहळा पार पडत असताना छत्रपति संभाजीराजे गडावर पोहचले. त्याच्यांसोबत त्यांचे अनेक समर्थकही होते. मात्र, मुख्य सोहळा होत असलेल्या शिवाई मंदिरापर्यंत जाण्यास छत्रपती संभाजीराजेंना मनाई करण्यात आली. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी विनंती करुनही छत्रपती संभाजीराजे स्टेजवर गेले नाहीत.
महत्वाच्या इतर बातम्या :