पुणे : भारतीय हवामान खात्याने (Pune IMD) पुढील तीन दिवस पुणे (Pune Maharashtra) आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी (Yellow alert)  केला आहे. येत्या काही दिवसांत (Monsoon) राज्याच्या उत्तर भागात आणखी पाऊस पडेल. सक्रिय मान्सूनच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात पावसाची अपेक्षा आहे. पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 


राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस चांगला पाऊस पडणार असून शेतकऱ्यांना काही दिवस दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. 


पुण्यात पुढील तीन ते चार दिवसांत हळूहळू पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  16 सप्टेंबर म्हणजे आज आणि 17 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार शहरात आठवड्याच्या शेवटी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 18 सप्टेंबरला यलो अलर्ट इशारा जारी केला आहे. हवामान तज्ञांच्या मते, सक्रिय स्पेलमुळे महाराष्ट्रात, विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. 


ऑरेंज अलर्ट जारी 


आज राज्यातील किमान 13 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बाकी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 17 सप्टेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस सुरू राहील. मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.


पुण्यात वातावरण कसं असेल ?


16 सप्टेंबर - आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


17 सप्टेंबर - आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी आणि  संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


18 सप्टेंबर - आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.






इतर महत्वाची बातमी-


Sharad Pawar New Office : अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाने स्वतंत्र कार्यालय थाटले, उद्घाटन कोण करणार?