Pune Weather Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर पुणे शहर परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. गेली सलग तीन दिवस संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाची हजेरी लागली असून, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस असणार आहेत, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे शहरातही पुढील दोन दिवस जोरदार पाऊस (Pune Heavy Rain) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे, पुणे शहरासह ग्रामीण भागात देखील गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस धुमाकूळ (Heavy Rain) घालतानाच चित्र आहे. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागात पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने सोमवारी राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला होता, तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र, कोकणातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बुधवारी (दि. 21) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांतही काही ठिकाणी यलो अलर्ट दिला, तर पुणे, सातारा, सांगली, नगर, नाशिक जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे.
विदर्भात शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट
गेल्या 24 तासांपासून उकाडा वाढल्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार, तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. मात्र या पावसाचा जोर विदर्भात वाढला असून त्या भागात 23 ऑगस्टपर्यंत मुसळधारेचा 'यलो अलर्ट' तर; कोकण, मध्य महाराष्ट्रात 22 पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाकडून आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.