पुणे : पुणे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या (रविवार) मतदान होणार आहे. जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 90 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्यापैकी बिनविरोध झालेल्या 12 ग्रामपंचायती वगळता उर्वरित 76 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. तर सोमवारी मतमोजणी होईल.
जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आणि सदस्यपदाच्या 834 जागांपैकी 268 सदस्यांची बिनविरोध निवड झाली, तर एकही अर्ज न दाखल झाल्याने सरपंचपदाच्या दोन आणि सदस्यपदाच्या 78 जागा रिक्त राहिल्या.
उर्वरित 76 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मतदान होत आहे. यामध्ये सरपंच पदासाठी 226 आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या 488 जागांसाठी 1160 उमदेवार निवडणूक रिंगणात आपलं नशिब आजमावत आहेत.
संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या ओळखपत्रासह आपला मतदानाच हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून सर्व साहित्यासह मतदान केंद्रावर पाठवण्यात आलं आहे.
पुणे जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 May 2018 05:04 PM (IST)
जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 90 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्यापैकी बिनविरोध झालेल्या 12 ग्रामपंचायती वगळता उर्वरित 76 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -