पुणे: देशात मोदी सरकार सत्तेत आल्यावर महागाई कमी होईल अशी अशा अनेकांना होती. मात्र सर्वांचा भ्रमनिरास झाला, असा दावा पुण्यातील सजग नागरिक मंचाने केला आहे.

इतकंच नाही तर देशात पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक टॅक्स हा महाराष्ट्रातच असल्याचंही सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी म्हटलं आहे.

वेलणकर म्हणाले, “मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर कोणतेही टॅक्स कमी झाले नाहीत. जीएसटीतून पेट्रोल डिझेल वगळण्यात आले आहे.  2015 मध्ये दुष्काळाच्या नावाखाली 2-2 रुपये डिझेल-पेट्रोल सेस वाढवण्यात आला. परत 2016 मध्ये 1 रुपये सेस पेट्रोल- डिझेलवर वाढवण्यात आला. आता 2017मध्ये दारूची दुकाने बंद करण्यात आली. सरकारला उत्पन्न कमी झाले.त्यामुळे परत 2-2रुपये पेट्रोल-डिझेलवर वाढवण्यात आले.

संपूर्ण देशात डिझेल -पेट्रोलवरील टॅक्स हे महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या असूनही, आपण मात्र अधिक दराने डिझेल -पेट्रोल विकत घेत आहोत”.