पुणे : बारामती लोकसभेला (Baramati Loksabha) अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare will be an independent candidate for the Baramati Lok Sabha) यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बारामती लोकसभेला तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या निर्णयाने शिंदे आणि अजित पवार गटातही ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

  


आज (13 मार्च) सासवडमध्ये माजी आमदार विजय शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे विजय शिवतारे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगतिले. विजय शिवतारे यांच्या भूमिकेनं बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. 


त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता


विजय शिवतारे म्हणाले की, सव्वा तास बैठक चालली आणि एकमताने ठराव पास करण्यात आल. बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही. मी देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेच्या मतदारसंघ आणि मालकी कोणाची नाही. सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे. आपला स्वाभिमान जागृत होऊन आपण लढलं पाहिजे. विशेषतः अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक काही नव्हतं. परंतु, अजित पवारांनी सभ्यतेची सगळी पातळी ओलांडली. ते म्हणाले की, अजित पवार यांनी नीच पातळी ओलांडूनही मी माफ केलं आहे. त्यांचा सत्कार देखील केला. तरीही  त्यांची गुर्मी तशीच होती, अशी टीका त्यांनी केली. 


ही जनतेनं हातात निवडणूक घेतली असून हुकूमशाही सरंजामशाही चालणार नाही. जनता मावळ तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार संघातील आम्ही 41 वर्षे तुम्हाला मत देतो, पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिला तो दाखवा? ठराविक काही असतील, पण शेतकऱ्यांना काय दिलं? जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश कालापासून असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या