पुणे: वैष्णवी हगवणेला (Vaishnavi Hagawane death) मृत्यू प्रकरणांतर आता हगवणेच्या गळ्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे. प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोर आलं आहे. थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडेकडून जप्त केला नाही, असा खुलासा आधी इंडस इंड बँकेने केला होता. तर आता जप्त केलेला जेसीबी ज्या गोडाऊनमध्ये ठेवला जातो त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी देखील जेसीबी गोडाऊनमध्ये आला नाही असं सांगत हगवणेंची (Vaishnavi Hagawane death) पोलखोल केली आहे. येळवंडेकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत पोहचलाच नाही, अशी माहिती खांडेभराडांनी पोलीस चौकशीत दिली आहे. त्यामुळं येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे हगवणेची माणसं होती आणि हा कटाचा भाग होता, हे समोर आलं आहे. तर जेसीबी जप्त करणारे हगवणेचे तीन भामटे एजंट यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे ग. र. न. 332/25 भादवी क. 420, 406, 34 सह आर्म्स ऍक्ट कलम 30 या गुन्ह्याचे तपासात इंडस इंड बँकचे लीगल मॅनेजर यांनी गुन्ह्यातील जेसीबी ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही रिकवरी एजन्सीला सूचना दिल्या नसल्याचे सांगितले आहे. असे असताना, खालील तीन इसम यांनी जेसीबी मशीन फिर्यादीचे चालकाकडून अनधिकृतपणे ताब्यात घेतले व ते आरोपी शशांक हगवणे याचे ताब्यात दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर तिघांना आज रोजी 02.07 वा. अटक करण्यात आली आहे. 

अटक केलेल्या व्यक्तींची नावे

 1. योगेश राजेंद्र रासकर, व. 25, रा. तळेगाव ढमढेरे2. गणेश रमेश पोतले, व. 30, रा. मोहितेवाडी3. वैभव मोहन पिंगळे, व. 27, रा. तळेगाव ढमढेरे

नेमकं प्रकरण काय?

जेसीबी हगवणे यांनी काळवंडे यांना विकला. मात्र जेसीबीचे हप्ते थकले म्हणून इंडस इंड बँकेने हा जेसीबी प्रकाश येळवंडे यांच्याकडून जप्त केला असं शशांक हगवणे याने भासवल्याचा समोर आलं आहे. या प्रकरणात इंडस इंड बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही प्रशांत येळवंडे यांच्याकडून कोणताही जेसीबी जप्त केला नाही. आम्ही कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळेच आता शशांक हगवणे यानेच त्याचे भामटे बॅंकेचे एजंट म्हणून पाठवून प्रशांत येळवंडे यांच्याकडून हा जेसीपी जप्त केला अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. 

हा जेसीबी जप्त केला असता तर तो बँकेने थेट गोडाऊनमध्ये नेला असता आणि त्या गोडाऊनचे मालक रणजित आणि भूषण खांडेभराड यांच्या गोडाऊनमध्ये देखील तो जेसीबी पोहोचला नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. या दोघांची देखील पोलिसांनी चौकशी केली, त्यांनी देखील चौकशी वेळी स्पष्ट सांगितलं की, येळवंडे यांच्याकडून जप्त केलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत आलेला नाही. बँकेने कोणतीही गाडी जप्त केली तर ती या गोडाऊनमध्ये येते परंतु तो जेसीबी तिथे आला नाही, म्हणजे थेट शशांक हगवणे यानी त्याची माणसं पाठवून प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबी जप्त करून घेतला आणि बँकेने जप्त केला आहे असं सांगितलं आणि तो थेट आपल्या ताब्यात घेतला, यामुळे आता शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर हे प्रकरण चर्चेत आलं. मात्र, आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.