पुणे : पुण्यातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यलयात अज्ञात पार्सल आलं. या पार्सलमध्ये डिटोनेटर, बॅटरी अशा बॉम्बसदृश वस्तू आहेत, अशी माहिती कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी दिली.


कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात बुधवारी (27 एप्रिल) दुपारी हे पार्सल अजित अभ्यंकर यांच्या नावाने आलं. डिटोनेटर, बॅटरी आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं इतर साहित्य या पार्सलमध्ये होतं. मात्र, या साहित्याची जोडणी करण्यात आली नव्हती.

आज पार्सल उघडल्यावर आतमध्ये बॉम्बसदृश वस्तू असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर अजित अभ्यंकर यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.

पार्सल कुणी पाठवलं आणि यामागे उद्देश काय, याबाबतचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.