Udayanraje On Lal Mahal Lavani : पुण्यातील ऐतिहासिक लाल महालमधील लावणी प्रकारावरुन छत्रपती उदयनराजे भोसलेंनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. या शुटींगसाठी कोणी आणि कोणत्या अटींवर चित्रीकरणासाठी परवानगी दिली, असा संतप्त सवालही उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.वैष्णवी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांवर योग्य कारवाई करा.मुळात लाल महालात लावणी शुट करणं योग्य नसून तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
या सर्व प्रकरणावर संभाजीराजेंनी ट्विट म्हटलं आहे की, लाल महल ही लावणी करण्याची जागा नाही. नाचण्याच्या चित्रीकरणासाठी देखील नाही. या वास्तूचा व्यावसायिक वापर खपवून घेणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी यावेळी दिला. लाल महल ही शिवप्रेमींसाठी महत्वाची जागा आहे. या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रिकरण करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी संभाजीराजेंनी दिला.
या लावणीचा पुण्यातील अनेक संघटनांकडून आणि पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. पुण्यामध्ये मराठा महसंघातर्फे ज्या ठिकाणी शूट झालं त्या ठिकाणचं शुद्धीकरण करण्यात आले. त्यांनतर सभामंडपात गोमूत्र तसेच गुलाबपाणी शिंपडून हा परिसर शुद्ध केला. दरम्यान, वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर फरासखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे या व्हिडीओत?
सध्या सगळीकडे ट्रेडिंग असलेल्या चंद्रा गाण्यावर संबंधित तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी थिरकताना दिसत आहे. संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना दिसत आहे. पुण्यातील ऐतिहासिक लाल महालमध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. तर मराठा सेवा संघाने लाल महालाचं शुद्धीकरण केलं, अभिषेक केला. लावणी हे लोकनृत्य आहे. महाराष्ट्राची शान आहे. लाल महालाचं शुद्धीकरण करण्याएवढी लावणी घाण आहे का? असा सवाल लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी उपस्थित केलाय.