Pune News : पुण्याच्या (Pune) चांदणी चौकात (Chandani Chowk) आता टेकडीसाठी दोन छोटे ब्लास्ट केले जाणार आहे. या दरम्यान चौकात एक तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान पहिला एक छोटासा ब्लास्ट केला जाईल. हा ब्लास्ट टेकडी हटवण्यासाठी केला जाणार आहे. 22 होल्समध्ये भरलेल्या स्फोटकांच्या आधारे हे कार्य पूर्ण केलं जाणार आहे. यासाठी मुंबईहून बंगळुरुच्या दिशेने जाणारा मार्ग दुपारी एक ते दोनच्या दरम्यान बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर बंगळुरु-मुंबई मार्गावरुन दोन्ही दिशेची वाहतूक सुरु ठेवली जाईल. 


यानंतर दुसरी टेकडी हटविण्याची तयारी करावी लागणार आहे. ती टेकडी हटवण्यासाठी देखील असाच एक ब्लास्ट केला जाणार आहे. त्यासाठी ही ब्लॉक घेण्याचं नियोजन आखण्यात आलं आहे. आधी सायकांळी वाहतुकीचा अंदाज घेण्यात येईल आणि त्यावर पुढचा ब्लॉक आज घ्यायचा की उद्या याचा निर्णय घेण्यात येणार आहे.


22 होल्सपाडून त्यात स्फोटकं भरणार
वाहतुकीला अडथळ असलेला चांदणी चोकातील पूल शनिवारी रात्री एकच्या सुमारास पाडण्यात आला. त्यानंतर राडा रोडा हटवण्यासाठी किमान आठ तास लागले. चांदणी चौकातील बाजूच्या जागेवर असलेल्या टेकड्या देखील पाडण्यात येणार आहे. त्यानंतर चांदणी चौकातील हायवे मोठा होणार आहे. यासाठी खास नियोजन करण्यात आलं आहे. पूल पाडण्यासाठी 1300 होल्स पाडण्यात आले होते आणि 600 स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. मात्र या टेकड्या पाडण्यासाठी 22 होल्सपाडून त्यात स्फोटकं भरण्यात येणार आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी एक ते दोनच्या दरम्यान काऊंटडाऊन देत या टेकड्या देखील पाडण्यात येणार आहे. त्यानंतर राडा रोडा उचण्याच्या कामाला सुरुवात होईल. 


'काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते'
पूल पाडताना रात्रीच्या वेळी पोलिसांनी सगळा परिसर निर्मनुष्य केला होता.  पुल पाडण्यात आम्ही 100 टक्के यशस्वी झालो आहोत, अशी माहिती उत्कर्ष मेहता एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीकडून देण्यात आली आहे. ब्लास्ट झाल्यानंतरही पुल पडला नसल्याचं बोललं जात होतं. त्यावर बोलताना कंपनीनं सांगितलं की, आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते. या पद्धतीला fragmentation असं म्हणतात जे पद्धत twin टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आली होती, त्याला impulsive ब्लास्टिंग असं म्हणले जाते. जो भाग मुद्दाम  ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते. त्याच भागासाठी हा ब्लास्ट केला जाणार आहे.



इतर महत्वाच्या बातम्या


Chandani Chowk : पूल पडताना पाहण्यासाठी सतरंज्या, चटया अन् खुर्च्या घेऊन या, पुणेकरांच्या भन्नाट सूचना 


Pune Bridge : अखेर चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त; मलबा हटवण्याचं काम प्रगतीपथावर, वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता