पुणे: मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजुतीतून, दोन अल्पवयीन मुलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कर्वेनगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, मुलीचे वडील आणि भावासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगा आणि आरोपीची मुलगी एकाच शाळेत शिकतात. मुलाकडून मुलीची छेड काढली जाते असा संशय मुलीच्या वडिलांना संशय होता. त्या संशयातून त्यानं 4 ते 5 जणांच्या जमावासह मुलाला आणि त्याच्या मित्राला गाठलं आणि त्यांना बेदम मारहाण केली.
तेवढ्यानं मन न भरल्यानं मुलांचे कपडे काढून त्यांची नग्नावस्थेत धिंडही काढण्यात आली. या घटनेनंतर पीडित मुलाच्या आईनं वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.