पुणे : पीएमपीएमएलचे व्यस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना चौथ्यांदा जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. मात्र या धमक्यांना घाबरुन कोणत्याही निर्णयात बदल करणार नाही, अशा शब्दात तुकाराम मुंढेंनी ठणकावलं.
तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलच्या सद्यस्थितीच्या काराभाराबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. हे महिन्याभरातील धमकीचं चौथं पत्र असल्याचंही तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
हे चौथं धमकीचं पत्र असून एकाच व्यक्तीचं असल्याचं लिखाणामधून दिसत आहे. टपालामधून हे पत्र आलं आहे. त्यात पुण्याच्या टपालाचा शिक्का आहे. या सर्व पत्राकडे भीतीने नव्हे, तर गांभीर्याने पाहत असून राज्य सरकारला या बाबत सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारने तातडीने सुरक्षाही पुरवली आहे, अशी माहिती तुकाराम मुढे यांनी दिली.
तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले. मात्र त्यांच्या या निर्णयांना विरोध असल्याने त्यांना सतत धमकीचं पत्र पाठवलं जात आहे. या पत्राविरोधत पोलीस तक्रार करण्यात आली असली तरी पत्र पाठवणाऱ्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
धमक्यांना घाबरुन कोणताही निर्णय बदलणार नाही : तुकाराम मुंढे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2017 07:36 PM (IST)
तुकाराम मुंढे यांना चौथ्यांदा धमकीचं पत्र देण्यात आलं आहे. मात्र या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -