पुणे: दोन दिवसांपूर्वी मानखूर्द येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक (Traffic jam on Mumbai-Pune highway) कोंडी निर्माण झाली होती, १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी ५ ते ६ तास इतक वेळ लागला होता, त्यानंतर आज देखील पुणे - मुंबई एक्सप्रेस (Traffic jam on Mumbai-Pune highway) वे ला सकाळी २ ते ३ तास ट्राफिक लागले आहे, या वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना देखील बसला, सकाळी जवळपास दोन ते तीन तास त्या वाहतूक कोंडीत अडकल्या. सुप्रिया सुळे पुणे - मुंबई एक्सप्रेस वे ला ट्राफिकमध्ये अडकल्याने झेंडावंदनसाठी वेळेत पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे पक्ष कार्यालयातील झेंडावंदन माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं.(Traffic jam on Mumbai-Pune highway)

Continues below advertisement

या वाहतूक कोंडीचा एक व्हिडीओ देखील सुप्रिया सुळेंनी शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी म्हटलंय की, नमस्कार, गेले दोन तास आम्ही सगळे वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. सकाळी आम्ही सात वाजता ठाण्यावरून निघालो होतो, आता दोन तास गाडीत बसून आमची आजुबाजूच्या लोकांसोबत मैत्री झाली आहे, तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, सगळे आम्ही वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. त्याचबरोबर आजुबाजूला असलेल्या कारमधील प्रवाशांनी देखील सुळेंच्या व्हिडीओमध्ये सांगितलं की, आम्ही देखील ७ वाजता निघालो होतो, महाराष्ट्र दिन स्पेशल म्हणत नागरिकांनी व्हिडीओमध्ये वाहतूक कोंडीबाबत भाष्य केलं आहे. तर सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे.(Traffic jam on Mumbai-Pune highway)

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे मुंबईवरून पुण्याकडे जात असताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण वाहतूक कोंडीत अडकल्या. त्या सुमारे दोन तासांहून अधिक काळ या ट्रॅफिकमध्ये होत्या सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या मोबाईलवरून या वाहतूक कोंडीचे फोटो आणि व्हिडिओ काढून आपल्या व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटसवर शेअर केले. त्यांनी "मुंबईपुणे रोड" असे लिहून हात जोडल्याचे इमोजी वापरत आपली हतबलता व्यक्त केली.त्या सकाळी ७ वाजता ठाण्यावरून निघाल्या होत्या. लोणावळ्याजवळील घाट परिसरात ही कोंडी झाली असून रस्ता अरुंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Continues below advertisement

 वाहतूक कोंडीत अडकलेल्या इतर प्रवाशांशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपरोधिकपणे "महाराष्ट्र दिवस स्पेशल" असे म्हणत प्रवाशांसोबत गप्पा मारल्या. काही प्रवाशांनी त्यांना सांगितले की ते अंधेरीवरून सकाळी ७ वाजता निघाले असून अद्याप ट्रॅफिकमध्येच आहेत. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'मिसिंग लिंक'चे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आणि सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येमुळे महामार्गावर सकाळपासूनच प्रचंड दबाव होता.घाटामध्ये रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांची गती मंदावली आणि मोठी कोंडी निर्माण झाली.१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी पुण्याला जात असताना सुप्रिया सुळे यांना या ट्रॅफिकचा मोठा फटका बसला.

सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे वाहतूक कोंडी

सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्याने काही वाहन बंद पडल्याची घटना घडली आहे. आजच मिसिंग लिंकच लोकार्पण सोहळा होत असताना प्रवाशांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी झाल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवून पुण्याकडची वाहतूक सोडवली जात आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतुक ही  खोळबंली आहे. थोडया वेळाने मिसींग लिंकचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार आहे.