पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींच्या अटकपूर्व जामिनावर 22 फेब्रुवारीऐवजी उद्याच (15 फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर उद्याच सुनावणी घेण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील डीएसकेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद संपला आहे. त्यामुळे त्यावरील सुनावणी 22 फेब्रुवारीला करण्याचे मुंबई हायकोर्टाने सांगितले होते. मात्र आता उद्याच (15 फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे.
13 फेब्रुवारीच्या अखेरच्या सुनावणीत डी. एस. कुलकर्णींना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारला हायकोर्टानं फटकारलं. इतके दिवस जी मागणी केली नाहीत ती आता शेवटी का करताय? असा सवालही हायकोर्टानं त्यावेळी विचारला होता.
त्याचवेळी, 13 फेब्रुवारीच्या सुनावणीवेळी डीएसकेंना मोठा दिलासा मिळाला होता. बुलडाणा अर्बन बँक डीएसकेंच्या मदतीला धावून आली. बुलडाणा अर्बन बँक डीएसकेंना 100 कोटींचं कर्ज देण्यास इच्छुक आहे. तसेच त्यांची विकण्यास योग्य असलेली 12 कोटींची संपत्तीही विकत घेण्यास उत्सुक असल्याचंही बँकेच्या वतीने कोर्टात सांगण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :
डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली!
डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर
जेल की बेल? डी. एस. कुलकर्णींचा आज हायकोर्टात फैसला
धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी डीएसके आणि अजित पवारांची भेट
"डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका"
कोर्टाच्या देखरेखीत मालमत्ता विकावी, डीएसकेंची मागणी
डीएसकेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्याच फैसला होणार
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
15 Feb 2018 08:44 PM (IST)
13 फेब्रुवारीच्या अखेरच्या सुनावणीत डी. एस. कुलकर्णींना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारला हायकोर्टानं फटकारलं. इतके दिवस जी मागणी केली नाहीत ती आता शेवटी का करताय? असा सवालही हायकोर्टानं त्यावेळी विचारला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -