Pune Ganeshotsav 2022: पुण्यात गणेशोत्सवासाठी तयारी जल्लोषात सुरु आहे. काही तासांनी गणपतींचं आमगन होणार आहे. पुण्यातील पाच मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जल्लोषात होणार आहे. काही मिनिटांच्या अंतराने पाचही मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. ढाेल ताशांच्या गजरात दोन वर्षांनी बाप्पा विराजमान होणार आहे. त्यासाठी पुणेकर आणि गणपती मंडळ सज्ज झाले आहेत.



श्री कसबा गणपती 
गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे
औचित्य असल्याने देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मांना सन्मान म्हणून हुतात्मा राजगुरु यांचे नातू धैर्यशील आणि सत्यशील यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.


श्री तांबडी जोगेश्वरी 
मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी  मंडळाच्या 'श्रीं'च्या आगमनाच मिरवणूक सकाळी 10:30 वाजता सुरु होणार आहे. शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल , विष्णूताद शंख पथक, आम्ही गोंधळी गोंधळी संबळ पथकचा देखील समावेश असणार आहे. 



गुरुजी तालीम मंडळ 
गुरुजी तालीम मंडळ मानाच्या तिसऱ्या मंडळाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 2:30 वाजता होणार आहे. मिरवणुक 10 वाजता सुरु होणार आहे. महिला नादब्रह्म पथक , नगारा वादन, गर्जना पथक आणि श्री ढोल ताशा पथकाच्या जल्लोषात ही मिरवणूक असणार आहे. 


 श्री तुळशीबाग गणपती
मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग मंडळाच्या 'श्रींची प्राणप्रतिष्ठापना गणपती मंडळाच्या श्रींची दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे. या साठीची मिरवणूक 10:30 वाजता सुरु होईल. नगरकर तालिम चौक, आप्पा बळवंत चौक, समाधान चौकातून ही मिरवणूक मंडपात प्रवेश करणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध शिवगर्जना , समर्थ प्रतिष्ठान ही पथकं सहभागी होणार आहे., समर्थ प्रतिष्ठान, उगम ही पथक येरवडा यांचा समावेश आहे. पथके सहभागी होणार आहेत.


केसरीवाडा गणेशोत्सव 
 मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 10:30  होणार आहे.त्यामुळे 10 वाजता रमणबाग चौक ते केसरीवाड्यापर्यंत चांदीच्या पालखीत दरवर्षी प्रमाणे मिरवणूक काढली जाणार आहे. शिवमुद्रा ढोल पथक आणि नगारा वादनदेखील सहभागी होणार आहे.


अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ मंडळ आणि भाऊसाहेब रंगारी 
त्यासोबत पुण्यातील महत्वाचे गणपती अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ मंडळ आणि भाऊसाहेब रंगारी गणपतीला देखील मोठी गर्दी असते. मोठ्या जल्लोषात हे तिनही गणपती विरामान होतात. त्यात अखिल मंडई मंडळ शारदा गजाननाची आगमन मिरवणूक  फुलांनी सजवलेल्या मंगल कलश रथातून होणार आहे. 12 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याबरोबर सगळ्या पुणेकरांचा लाडका बाप्पा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक 8: 30 वाजता मंदिरातून गरुड रथातून काढण्यात येणार आहे.  11: 37 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. भाऊसाहेब रंगारी गणपती 12:30 ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. कलावंत पथक, अभेद्य पथक यासारख्या तीन पथकांचा समावेश असणार आहे.