Amit Thackrey In Pune: मनसे विद्यार्थी सेनेची संघटनात्मक (MNS) बांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackrey) मैदानात उतरले आहेत. ते तीन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहे. मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानासाठी ते तीन दिवस पुण्यात असणार आहे. याआधी त्यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला त्यानंतर तीन दिवसांसाठी ते पुण्यात येणार आहे. त्यांच्या दौऱ्यात नेमकं काय घडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी अमित ठाकरे यांचा हा दौरा निश्चित करण्यात आला आहे.
12 ते 14 ऑगस्ट दरम्यान ठाकरे हे पुणे शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहे. यामध्ये ते महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्याचा त्यांच्या दौऱ्याचा हेतू आहे. त्याबरोबरच सर्व मतदारसंघात देखील ते भेट देणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेणार आहे.
शिरूर मधील 5 आणि पुण्यातील 8 मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. 12 ऑगस्टला अमित हे कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट या ठिकाणी करणार दौरा करणार आहे. त्यासोबतच कोथरुडमध्ये बाईक रॅलीतसुद्धा सहभागी होणार आहे. 13 तारखेला पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघाचा दौरा करणार आणि 14 ऑगस्टला अमित ठाकरेंता शिरूर, चाकण आणि खेडमध्ये दौरा असणार आहे.
आदित्य ठाकरेनंतर अमित ठाकरे अॅक्शन मोडवर
मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा बचाव करण्यासाठी शिवसंवाद यात्रा केली होती. या यात्रेदरम्यान त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला होता. शिवसैनिकांना संबोधित केलं. अनेक कार्यकर्त्यांना भेटी घेतल्या. त्यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाची सुरुवात केली आहे.