SPPU Pune: पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटमध्ये रुची आहे. त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) एज्युकेशनल मल्टीमीडिया रिसर्च सेंटर (EMMRC) आणि कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन (CEC) मार्फत विविध ऑनलाइन क्रेडिट कोर्सेस सुरू केले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम मोफत असतील. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी परिक्षा होणार त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र आणि क्रेडिट गुण दिले जाणार आहे. यासाठी 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे.
या अभ्यासक्रमांमध्ये या विषयांचा समावेश आहे.
-Fundamentals of Office Management and Methods,
-Indian Classical Dance
- Kathak
-Microeconomics
-Personality Development
-Personality Development and Communication Skills
यासाठी swayam.gov.in या वेबसाइटवर नाव नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर, विद्यार्थी व्हिडिओ लेक्चर्स आणि माहिती मिळवू शकणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना दर आठवड्याला असाइनमेंटसुद्धा दिल्या जाणार आहे.
विद्यार्थ्यांना विविध कौशल्य शिकण्याची संधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) एज्युकेशनल मल्टीमीडिया रिसर्च सेंटर (EMMRC) आणि कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन (CEC) मार्फत विद्यार्थ्यांना मोफत विविध कौशल्य शिकण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. अनेक देशांमध्ये विविध कौशल्याबाबत शिक्षण दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या विषयांमध्ये रुची निर्माण होते. काही विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर असे अनेक अभ्यासक्रम करायचे असतात मात्र सुरु असलेल्या शिक्षणामुळे अशा अभ्यासक्रमासाठी वेळ देता येत नाही. ऑनलाइन क्रेडिट कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु असताना देखील या अभ्यासक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
SPPU च्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून विशेष परीक्षा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेवा योजनांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेसाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या इतर गुणांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची संधी असणार आहे. विशेष परिक्षा नसल्याने याआधी अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी अडचणी येत होत्या मात्र त्याची ही अडचण समजून घेत विद्यापीठाने निर्णय घेतला आहे.