Pune Traffic News: पुण्यातील विद्यापीठ (pune university) चौकातील वाहतूक कोंडी (Traffic) सुटणार असल्याची माहिती आहे. पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे महापालिका(PMC) अधिकारी एकत्रित काम करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या सगळ्याचं प्लॅनिंग किंवा मार्ग नेमका कसा असेल यासाठी त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार करुन माहिती दिली आहे. विद्यापीठ चौकात शहरातील सर्व मुख्य रस्ते मिळत असल्याने मोठी वाहतूक (Pune Trafiic) कोंडी होत आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस ही वाहतूक कोंडी फुटावी यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यावर आता तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आणि पीएमआरडीएकडून थेट प्रेझेंटेशन तयार केलं आहे. त्यात नियोजन कसं असेल यासंर्भात सगळी माहिती देण्यात आली आहे.


मेट्रोपुलासह विद्यापीठ चौकात उड्डाणपूल देखील असणार आहे.  विद्यापीठ चौकात फ्लाय ओव्हर आणि त्यावरून मेट्रो धावणार आहे. पुण्यातील विद्यापीठ चौकात चार मजली उड्डाणपूल बनणार आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार असल्याचा दावा पीएमआरडीए आणि पुणे पालिकेकडून करण्यात आला आहे. या सगळ्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. येत्या सप्टेंबर 2022 पासून कामाला सुरुवात होऊन नोव्हेंबर 2024पर्यंत होणार कामाची पूर्तता होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


पुणे विद्यापीठातील चौकातून तीन वेगवेगळ्या परिसरात रस्ते जातात. पाषाण, बाणेर आणि औंध अशा विविध परिसरात रस्ते जात असल्याचे पुण्यातील महत्वाचा चौक मानला जातो. याच चौकात पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अधिक काळ वाहतूक कोंडीत वाया जात असल्याने पुणेकांनी अनेकदा या चौकाबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे मेट्रोच्या कामासोबतच एक उड्डाणपुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोच्या पुलाच्या खाली एक उड्डाणपूल बांधणार आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटणार असल्याचा दावा पीएमआरडीए अभियंता विवेक खरवडकर यांनी केला आहे.


वाहतुकीचं योग्य नियोजन
या परिसरातून बाणेर, पाषाण, औंध, शिवाजी नगर, रेन्जहिल्स या सगळ्या भागात वाहतूकीचं योग्य नियोजन करण्यात येणार आहे. या पाचही परिसरात वाहतूकीची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी दोन वर्ष वाट बघावी लागणार आहे.