Pune independence day 2022: पुण्यात (Pune)15 ऑगस्टचे ध्वजारोहण कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील  पुण्याऐवजी कोल्हापूरला (Kolhapur) करणार आहेत. तसं परीपत्रक राज्य सरकारकडून काढण्यात आलं आहे. पुण्यात 15 ऑगस्टचे ध्वजारोहण चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) करणार असं कालच्या (11 ऑगस्ट) परीपत्रकांत सांगण्यात आलं होतं मात्र दरवर्षी पुण्यातील 15 ऑगस्टचे ध्वजारोहण राज्यपालांच्या हस्ते होतं. त्यामुळे हा बदल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. काल अचानक राज्य सरकारच्या परीपत्रकात चंद्रकांत पाटील यांचं नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. 


महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने 15 ऑगस्टला संबंधित जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करणार? असा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यानुसार जबाबदाऱ्यांचं वाटप केलं. एक परीपत्रक काढून त्यांनी मुख्यमंत्री वगळता 19 मंत्र्यांना जिल्हे वाटून देण्यात आले. त्यानंतर काही जिल्ह्यात जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील असंही सांगण्यात आलं.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर असणार आहे. त्यांचा संपूर्ण कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे, असं असताना राज्य सरकराकडून जी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात चंद्रकांत पाटील यांचं नाव होतं. आतापर्यंत दरवर्षी पालमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहतात मात्र ध्वजारोहण करण्याचा मान हा राज्यपालांनाच असतो.  अशा परिस्थितीत या यादीत चंद्रकांत पाटील यांचं नाव कशामुळे टाकण्यात आलं?, असे प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने स्वतंत्र परीपत्रक काढून या निर्णयात बदल केला आहे.


पुण्यात 'हर घर तिरंगा' जल्लोषात साजरा होणार
पुणे जिल्ह्यात 21 लाख 60 हजार कुटुंबे असून या प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्याचं नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापड उद्योग, व्यवसाय असून त्या माध्यमातून ध्वजाची उपलब्धता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माफक दरात ध्वज उपलब्ध करुन देण्यात येणार असून काही दानशूर संस्था, सहकारी साखर कारखाने आदींकडून गरजूंना ध्वज मोफत उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गतच महिला व बालविकास विभागाच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने ‘हर घर तिरंगा!, हर घर पोषण!!’ (घरोघरी तिरंगा! घरोघरी पोषण!!) उपक्रम राबवण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कळवले आहे.