Bhushi dam Lonavala: लोणावळ्याच्या भुशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. शिवदुर्ग बचाव पथकाने भर पावसात हे कार्य केलं आहे. साहिल सरोज अस त्या मृत तरुणाचे नाव होते. तो त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह लोणावळ्यात आला होता. तेंव्हा भुशी धरणाच्या बॅक वॉटरला धबधब्याखाली ते भिजण्याचा आनंद घेत होते. 


नक्की काय घडलं?
काही दिवसांपुर्वीच लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे या विकेंडला  साहिल सरोज हा आपल्यामित्रांबरोबर भुशी धरणाला फिरायला गेला होता. मित्रासोबत पाण्याचा आस्वाद घेत असताना त्याच्या पाय घसरला आणि वाहत गेला. मित्रांनी त्यांच्या डोळ्यादेखत साहिलला वाहत जाताना पाहताच अनेकांनी पोलिसांना आणि स्थानिक बचाव पथकाला माहिती दिली. मात्र अनेक तास मृतदेह सापडत नव्हता. काही क्षणातच दिसेनासा झाला. त्यानंतर लोणावळा पोलीसांनी शिवदुर्ग बचाव पथकाला पाचारण केले, काल अंधार झाल्यानं थांबलेलं बचावकार्य आज पूर्ण करण्यात आलं. अनेक तासांनंतर  शिवदुर्ग बचाव पथकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली असता आज तो मृतदेह सापडला.


लोणवळा, पानशेत, खडकवासला, माळशेज घाट, विसापूर किल्ला, ताम्हिणी घाटावर अनोनात गर्दी बघायला मिळाली. शहरात आणि आजुबाजूच्या परिसरात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी अनेक अपघात होतात. मोठ्या दरडी कोसळतात. फिरण्याचा उत्साह नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. दरवर्षी अनेक पर्यटक याच उत्साहात जीव गमावतात. 


पुण्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला दिलासा मिळाला आहे. आठवडाभार पावसाचा जोर कायम असेल असा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. पुण्याजवळील घाट परिसरात आणि धरण परिसरात संततधार पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात  मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.