पुणे : ऐनवेळी नीटची परीक्षा जाहीर होऊनही पुण्याच्या तेजश्री पाटीलने दिवस रात्र एक करत दिव्यांगांमधून 28 वा क्रमांक मिळवला. तरीही तिला दिव्यांगांच्या कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळाला नाही. कारण दिव्यांगांना सादर करावं लागणार 40 टक्के अपंगत्त्वाचं प्रमाणपत्र ती वेळेत सादर करू शकली नाही.
40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असल्याचं सिद्ध करण्यासाठी तेजश्री आणि तिचे वडील दिल्लीत 15 दिवस तळ ठोकून होते. अखेर तेजश्री 42 टक्के अपंग असल्याचं प्रमाणपत्र दिल्लीतल्या केंद्राने दिलं. मात्र प्रमाणपत्र सादर करण्याची वेळ निघून गेल्याचं सांगत तेजश्रीला एमबीबीएसचा प्रवेश नाकारण्यात आला.
दरम्यान तेजश्रीवर कोणताही अन्याय झाला नसल्याचा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
सरकारी कॉलेजमधल्या एमबीबीएसच्या 3 टक्के जागा दिव्यांगासाठी राखीव आहेत. या नियमानुसार महाराष्ट्रातल्या एमबीबीएसच्या 75 जागा दिव्यांगासाठी राखीव आहेत.
मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाने दिव्यांगांच्या 16 तर अंधांसाठी 8 अशा 24 जागाच भरल्या. तर खुल्या वर्गासाठी 51 जागांची हेराफेरी झाल्याचा आरोप होत आहे.
निसर्गाच्या अन्यायाला बळी पडलेल्या दिव्यांगांना शक्य ती मदत करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र इथे नियमांवर बोट ठेवून तेजश्री आणि तिच्या सारख्या अनेक दिव्यांगाचे हक्क डावलले जात आहेत.
वेळेत अपंगत्वाचं प्रमाणपत्र न मिळाल्याने एमबीबीएसचा प्रवेश हुकला
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
15 Sep 2017 07:25 PM (IST)
ऐनवेळी नीटची परीक्षा जाहीर होऊनही पुण्याच्या तेजश्री पाटीलने दिवस रात्र एक करत दिव्यांगांमधून 28 वा क्रमांक मिळवला. मात्र वेळेत अपंगत्वाचं प्रमाणपत्र सादर करता न आल्याने तिचा एमबीबीएसचा प्रवेश हुकला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -