पुणे: भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने टीम इंडियाला आपल्या पुण्यातील घरी आमंत्रित केलं होतं. यावेळी जाधव कुटुंबियांनी कर्णधार विराट कोहलीसह भारतीय संघाला खास महाराष्ट्रीय पदार्थांची मेजवानी दिली.


भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वन डे सामना उद्या (25 ऑक्टोबर) पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यासाठी टीम इंडिया काल पुण्यामध्ये दाखल झाली. तेव्हा केदार जाधवनं टीम इंडियाला आपल्या नव्या घरी भोजनासाठी  बोलावलं होतं. यावेळी विराट कोहली आणि टीम इंडियाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

सेहवागकडून टेलरचा 'दर्जी' उल्लेख, टेलरचंही हिंदीतून उत्तर

जाधव कुटुंबियांच्या आदरतिथ्याने कोहली आणि टीम इंडिया भारावून गेली.

केदार जाधवच्या घरी भारतीय क्रिकेटपटू येणार अशी कुणकुण लागताच तिथे चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. खेळाडूंना घेऊन गाडी येताच गर्दी वाढली. मात्र पोलिसांनी गर्दीतून वाट काढत खेळाडूंना केदारच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचवलं.

पहिल्या सामन्यात पराभव

दरम्यान, न्यूझीलंडने पहिल्या वन डे सामन्यात भारताचा 6 विकेट्स राखून पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

टॉम लॅथम आणि रॉस टेलरने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 200 धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

संबंधित बातम्या

संपूर्ण कारकीर्दीत एकही नो बॉल न टाकणारे 5 गोलंदाज 

16 वर्षीय बॉल बॉयकडून विराटचा अप्रतिम झेल

सेहवागकडून टेलरचा 'दर्जी' उल्लेख, टेलरचंही हिंदीतून उत्तर

रॉस टेलर-लॅथमची अभेद्य भागीदारी, न्यूझीलंडचा 6 विकेटने विजय