पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिगवन परिसरातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दादासाहेब अंकुश खरात असं नराधम शिक्षकाचं नाव आहे. पीडित मुलीच्या पालकांनी भिगवण पोलीस ठाण्यात दादासाहेब खरात याच्या विरोधात तक्रार दिली असून त्यावरून भिगवण पोलिसांनी खरात विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 


दादासाहेब खरात याच्याविरोधात गेल्या तीन चार महिन्यापूर्वी देखील अशीच तक्रार पालकांनी शाळेत केली होती. पंरतु शाळेने कोणतीही ठोस पावले उचलली नव्हती. शाळेने फक्त त्याच्याकडून माफी नामा लिहून घेतला आणि झाल्या प्रकणावर पडदा टाकला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 


जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या लहान मुलीला एकटीला वर्गात ठेवून तिला तू शाळेत रोज येत जा, तू नाही आली तर मला करमत नाही आणि हे बघ मी तुझे नाव माझ्या हातावर दिलाच्या आकारात लिहले आहे,  असे म्हणत या नराधमाने तिच्याशी अश्लील चाळे करून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र,  मुलीने या नराधमाच्या हातातून सुटका करून घेत तेथून पळ काढला. घरी धाव घेत झालेल्या प्रकारची माहिती आई वडिलांना दिली. 


आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार पालकांना समजताच पालकांनी शाळेत धाव घेत शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकासह भेट देत पालकांना आरोपी विरोधात गुन्हा नोंद झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.


दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनी बाबत अत्यंत गंभीर प्रकार घडला असताना प्रभारी मुख्याध्यापक यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली असून त्यांच्या सुचनेने पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या आधी देखील या नराधमाने पाठीमागे असे प्रकार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चार महिन्यापूर्वी दादासाहेब खरात याने असाच प्रकार केल्याचे उघडकीस आले होते. मात्र शाळा प्रशासनाने माफीनामा लिहून घेत झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचे काम केले होते अशीही माहिती समोर आली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Mumbai : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


कल्याण रेल्वे स्थानकावरून अडीच वर्षाचे बाळ पळवले, दोघांना ठोकल्या बेड्या