पिंपरी चिंचवड : तळेगावात 65 वर्षांच्या प्राचार्यांना माजी विद्यार्थिनीनेच ब्लॅकमेल केल्याचं समोर आलं आहे. मित्राच्या मदतीने या तरुणीने प्राचार्यांकडे तब्बल 30 लाखांची खंडणी मागितली होती.
सुनीता करवंदे असं 32 वर्षीय माजी विद्यार्थिनीचं नाव आहे. 48 वर्षीय मित्र स्वप्नील घागच्या मदतीने तिने हा डाव रचला. तो पुण्याच्या कल्याणीनगर भागातील रहिवासी आहे.
मला मार्गदर्शनाची गरज आहे, असं सांगून सुनीताने प्राचार्यांशी फोनवरुन संपर्क साधला. 1 जूनला पिंपरीतील घरी बोलावून तिने प्राचार्यांना मारहाण केली आणि अर्धनग्न अवस्थेत काही फोटो काढले.
हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीस लाख रुपयांची मागणी केली. प्राचार्यांनी त्यापैकी नऊ लाख रुपये दिले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने माजी विद्यार्थिनी आणि तिच्या मित्राला उर्वरित पैसे घेताना आज तळेगावमध्ये रंगेहाथ अटक केली.
प्राचार्याला ब्लॅकमेल, तळेगावात माजी विद्यार्थिनीसह मित्राला अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jun 2018 11:55 PM (IST)
तळेगावात 65 वर्षांच्या प्राचार्यांना माजी विद्यार्थिनीनेच मित्राच्या मदतीने ब्लॅकमेल केलं आणि 30 लाख रुपयांची खंडणी मागितली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -