पुणे:  पुण्यात स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना काल (शुक्रवारी) चौथ्या दिवशी यश आलं आहे. तब्बल 72 तास नराधम आरोपी मोकाट फिरत होता. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या शिरूर तालुक्यतील त्याच्या मुळगावी गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे. दत्ता गाडेला पकडण्यासाठी जवळपास 500 पोलिस, इतर टीम, स्थानिक, ड्रोन, श्वान पथक प्रयत्न करत होतं. दत्तात्रय गाडेने घटनेनंतर गाव गाठलं, गावातील काल्याच्या कीर्तनात हजेरी लावली होती, घटनेनंतर तो घरीही गेला होता. त्यानंतर जेव्हा ही बातमी आणि त्याचो फोटो व्हायरल होऊ लागले तेव्हा तो सावध झाला. गुनाट गावात दुपारी शहर पोलिस आल्याचे दिसताच दत्तात्रयने शेताच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर 13 पथकांच्या साहाय्याने सुरू झाला शहर पोलिसांचा तपास, गुन्हे शाखा विभाग, स्वारगेट पोलिस पथक, झोन 2 चे पथक गुनाट गावात तळ ठोकून बसले होते. अनेक पथकं, स्थानिकांची मदत यामुळे गाडेला पकडण्यात यश आलं आहे.

Continues below advertisement

आरोपीने या ठिकाणी देखील होता नजर ठेवून?

यादरम्यान अन्य पोलिस पथकांचा तपास अन्य दिशेने मंगळवारी आरोपी दत्तात्रय हा त्याच्यात गावात पोलिसांना सापडेल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसं झालं नाही. बुधवारी पोलिसांनी 500 पोलिसांच्या मनुष्यबळासह 500 गावकऱ्यांच्या मदतीने आरोपीचा आजुबाजूच्या उसाच्या शेतात शोध घेतला. तर दुसरीकडे बुधवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या एका पथकाने आरोपीची गेल्या वर्षभरातील ठिकाणांची सीडीआरच्या माध्यमातून माहिती घेतली. त्यामध्ये आरोपीचा पंढरपूर, उज्जैन, शिर्डी, शनिशिंगणापूरसह स्वारगेट, श्रीगोंदा, दौंड येथील रेल्वे आणि बस स्थानकावर जास्त वावर असल्याचे त्यातून निष्पन्न झाले आहे. तोपर्यंत पोलिसांनी त्याची वर्षभरातील मुक्कामाची ठिकाणे, मित्र, नातेवाईक यांची माहिती मिळवली होती. त्याच्या आई-वडिलांची, भावाची, मित्र, मेत्रिणीची चौकशी करण्यात आली होती.

सविस्तर घटनाक्रम असा

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या प्रयत्नांना शुक्रवारी पहाटे यश आले आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर.1. मंगळवारी (दि. 25) पहाटे सहाच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये घडली अत्याचाराची घटना घडली.2. मंगळवारी सकाळी 09.30 च्या सुमारास पीडिता स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाली, तोवर आरोपी बसने आपल्या गावी गेला.3. सकाळी 10 च्या सुमारास स्वारगेट पोलिसांनी बस स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेज तपासून दत्तात्रय गाडे हा आरोपी असल्याचे निष्पन्न केले. (पीडितेने देखील हाच आरोपी असल्याचे पोलिसांना सांगितले, तपास सुरू झाला होता.)4. सकाळी 10 वाजता आरोपी दत्तात्रय गाडे त्याच्या गुनाट गावातील काल्याच्या कीर्तनात सहभागी झाला होता.5. पोलिसांनी गुन्ह्याच्या वेळी आरोपीचे लोकेशन तपासले असता ते स्वारगेट बस स्थानकात आढळून आले.6. सकाळी 11 वाजता स्वारगेट पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक गुनाट गावाकडे रवाना झाले.7. दुपारी अडीचच्या सुमारास पोलिस गुनाट गावात दाखल झाले.8. दुपारी 4 वाजता आरोपी पकडल्याची माहिती मिळाली. मात्र, तो दत्तात्रयचा भाऊ असल्याचे निष्पन्न झाले. दत्ता गाडे आणि त्याचा भाऊ दिसायला एकसारखे दिसतात.9. आरोपी दत्तात्रय घराकडे येत असताना त्याने पोलिसांना बघितल्यावर उसाच्या शेतातपळ काढला.10. गावकऱ्यांनी दत्तात्रयला गावाच्या परिसरातच बघितल्याचे सांगितल्याने शोधाशोध सुरू झाला होता.11. बुधवारी (दि. 26) दुपारी 12च्या सुमारास अत्याचाराची घटना उघडकीस आली. गुन्हे शाखा, स्वारगेट पोलिस, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 18 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू झाला.12 . पोलिसांकडून सरपंच, पोलिस पाटील, तरुण मुलांच्या बैठकांना सुरुवात झाली. यावेळी आजूबाजूच्या अन्य गावच्या लोकांना बोलावत फोटो देऊन आरोपी दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.13. आरोपी दत्तात्रय शेतात दिसल्याची गावकऱ्यांची पुष्टी केली.14. रात्री आठच्या सुमारास आरोपी गावातील नातेवाइकाकडे पाणी पिण्यासाठी आला होता.15. गुरुवार (दि. 27) पुणे पोलिसांनी धाराशिव येथून 2 थर्मल ड्रोन मागवले. यासह श्वान पथकासह सकाळी साडेदहापासून शोधाशोध सुरू झाला.16 . श्वान पथकाने दत्तात्रयचा ज्या ठिकाणी वावर होता अशा 3 ठिकाणी पोलिसांना नेले सर्वात्र शोध घेतला.17. ऊस पूर्ण वाढलेला असल्याने, तसेच 150 एकरमध्ये उसाची शेती असल्याने पाणी, दलदल यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.18 . रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी चांदणशिव वस्तीतील बहिरट यांच्या घरी पाणी पिण्यासाठी आला. त्यांनी दार न उघडताच खिडकीतून पाणी दिले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पोलिस कर्मचारी असलेल्या त्यांच्या भावाला दत्तात्रयबाबत माहिती दिली.19. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने पुणे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गावातील 300 मुले, गुन्हे शाखेचे 70 कर्मचारी आणि स्वारगेट पोलिसांचे 20 कर्मचारी दुचाकीवरून आरोपीच्या शोधात होते.20. मध्यरात्री1 वाजून 10 मिनिटांनी गावापासून 150 ते 200 मीटर असलेल्या माळरानात (क्रिकेटचे मैदान) चरीतून पळताना आरोपी दत्तात्रयला पकडले.21. मध्यरात्री दीडच्या सुमारास स्वारगेट पोलिस ठाण्याचे एपीआय मोकाशी व पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपीला घेऊन स्वारगेट पोलिस लष्कर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आलं.

Continues below advertisement