Swargate Bus Depot Case : स्वारगेट बस स्थानकात (Swargate Bus Depot Case) मंगळवारी (दि.25) एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. दरम्यान, अत्याचार केल्यानंतर हा आरोपी दत्ता गाडे हा फरार होता. त्यानंतर पोलिसांनी मोठी कसरत करत त्याला त्याच्याच गावातून आज (दि.28) मध्यरात्री अटक केली. त्यानंतर आज आरोपी दत्ता गाडेला (Datta Gade) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी दत्ता गाडे यांच्या वकिलाने कोणते दावे केले आहेत? जाणून घेऊयात...

Continues below advertisement

आरोपीसाठी तीन वकिल काम करत आहेत. वाजीद खान, सुमित पोटे, अजिंक्य महाडिक हे तीन वकिल आरोपीसाठी न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. त्यांनी काय काय म्हटलंय पाहूयात.. 

तिने 'वाचवा-वाचवा', असंही म्हटलेलं नाही - वकिल

आरोपीचे वकिल म्हणाले, ती मोठ्याने ओरडू शकत होती. डिफेन्ससाठी लोक बोलावू शकत होती. मात्र, यामध्ये कोणतीही जबरदस्ती झालेली नाही. तिने 'वाचवा-वाचवा', असंही म्हटलेलं नाही. न्यायालयाने दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Continues below advertisement

आम्ही आरोपीला विचारलं की, सत्य घटना काय आहे? त्यावेळी त्याने सांगितलं की, गाडीमध्ये अगोदर ती चढली. त्यानंतर मी गेलो. आमच्यामध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं. दोघांच्या मर्जीने झालेलं आहे. तो का पळाला याच्याबाबत आम्हाला काही माहिती नाही. पोलिसांनी रिमांडमध्ये मागणी केली आहे की, त्याचा मोबाईल जप्त करायचा आहे. त्याचं मेडिकल करायचं आहे आणि त्याचे साथीदार कोण होते? हे तपासण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली होती. त्यानंतर  त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

तो आता ऑन रेकॉर्ड आलेला आहे

सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार, आरोपीने आम्हाला सांगितलं की, अगोदर गाडीमध्ये ती चढली. त्यानंतर मी चढलो. दोघांच्या मर्जीनुसार फिजिकल रिलेशन झालं असेल तर रेप केस होत नाही. त्यांच्यामध्ये जे काही झालेलं आहे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे. मुलगी स्वत:हून बसमध्ये जात असताना दिसत आहे. तो आता ऑन रेकॉर्ड आलेला आहे.  दत्ता गाडेवर या आधी 5 ते 6 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत, असंही वकिलांनी म्हटलं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dattatray Gade Arrested : जीव द्यायला गेला पण दोरी तुटली! अटक होण्याआधी आरोपीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न? गळ्यावर दोरीचे व्रण, पोलीस आयुक्तांची माहिती