पुणे : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे महापालिकेतील भाजपच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
पुणे महापालिका यंदा गणेशोत्सवाचं 125वं वर्ष साजरं करत असून याबाबत भाजपच्या कारभाराबद्दल आपण समाधानी आहात का? या प्रश्नावर उत्तर देताना कलमाडी म्हणाले की, 'होय, मी समाधानी आहे.'
पुणे फेस्टिव्हल माहितीसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कलमाडी बोलत होते. त् पुनरागमनाबाबत पत्रकारांनी विचारलं असता ‘वाट पाहा’ असं सूचक उत्तर कलमाडींनी यावेळी दिलं. त्यामुळे कलमाडी राजकारणात परतणार का? याबाबत नवी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, 29 व्या पुणे फेस्टिव्हलचं एक सप्टेंबरला दिग्दर्शक सुभाष घई आणि खाजदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते उद्धघाटन होणार आहे. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक सुरेश कलमाडी यांनी काल (रविवारी) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गणेशोत्सवाबाबत पालिकेच्या कारभाराबद्दल मी समाधानी: कलमाडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2017 09:11 AM (IST)
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे महापालिकेतील भाजपच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केल्यानं त्यांचं राजकारणात पुनरागमन होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -