Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीला आणि अजित पवारांनी समर्थक आमदार, खासदार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये सामील होऊन अनेक महिने झाले. त्यानंतर आजही या पक्षफुटीबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांच्या ईडीच्या कारवाईमुळे आम्ही महायुतीसोबत गेल्याचा विषय चांगलाच चर्चेत आला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील गौप्यस्फोट करत अजित पवारांच्या निर्णयाला सहमती दर्शवणारे संकेत शरद पवारांनी दिल्याचं तटकरेंनी म्हटलं, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी याबाबत आव्हान देत या दोन्ही बाजुच्या गोष्टी मला माहिती असल्याचं म्हटलं आहे.


2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीनंतर वारंवार शरद पवारांच्या पक्षाकडून अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्याकडे आरोप होतं आहेत, पण या सगळ्या लोकांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझा मुलाखतीत अनेक मोठे गगौप्यस्फोट केले होते, अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याच्या निर्णयाशी सहमती दर्शवण्याचे संकेत शरद पवारांनी दिले होते असा दावा तटकरे केला. 


काय म्हणाले सुनील तटकरे?


आम्ही जी भूमिका घेतली त्याच्यानंतर सुद्धा एक महिन्यापर्यंत चर्चा झाली. चव्हाण सेंटरला भेटायला गेलो होतो. ती भेट अशीच झाली नव्हती. पावसाळी अधिवेशन सुरू होतं, अधिवेशनाचे शेवटच्या दिवशी सुद्धा घोषणा करण्यात येणार होती. अजित पवारांनी निर्णय घेतलेला आहे. त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांचा विश्वास जास्त होता, ते तसंच होईल. आमच्यापैकी बहुतांश जणांना वाटत होतं, नाही. ते टाईम किलिंग आहे आणि आपल्याला ते रॉंग बॉक्समध्ये टाकण्यासाठी चालवला आहे. कोणी स्वतःच्या सोयीसाठी आणि राजकारणासाठी अजित पवारांना व्हिलन बनवण्याचा प्रयत्न करू नका असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी तटकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. 


नेमकं काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे? 


प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांना, कोणालाही मी अतिशय विनम्रपणे सांगते. कोणी असे आरोप केले त्याला देखील सांगते हे आरोप एका बाजूने केलेले आहेत, एका बाजूने आरोप करू नका. ते म्हणतील ती वेळ ते म्हणतील तो दिवस, ते म्हणतील तो चैनल किंवा सगळे चैनल कारण, दोन्ही बाजू काय झालं, हे फक्त सुप्रिया सुळेला माहिती आहे. कारण दोन्ही बाजूनी मी सर्वांना बोलत होते असं सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.