पुणे : मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushif) यांनी मतदारांना हेलिकॉप्टरने आणू, असं जाहीर सभेत वक्तव्य केलं. हे म्हणजे "बडे लोग, बडी बाते" असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) मुश्रीफांचा समाचार घेतला. बारामती लोकसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मैदानात उतरले. इंदापुरात येऊन सुप्रिया सुळेंचे प्रचार प्रमुख प्रवीण माने यांची भेट घेतली. मात्र ही भेट शरद पवार यांना संपवण्याच्या षडयंत्राचा भाग असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. अजित पवार या षडयंत्राचा भाग आहेत का? यावर मात्र थेट न बोलता भाजपचे हे कारस्थान असल्याचे त्या म्हणाल्या. चंद्रकांत पाटील हे शरद पवार यांना संपवायचे हे बारामतीत येवून बोलले, पवार यांना हे संपवण्याचे कारस्थान असल्याचा पूनरोच्चार त्यांनी केला.


हा देश सर्वसामान्यांचा देश आहे. त्यात हेलिकॉप्टरची प्रलोभन दाखवली जात आहे. ही सर्वसामान्य जनता आहे. त्या जनतेसमोर बडे लोग, बडी बाते करताना दिसत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


पवार साहेबांना संपवणे, हे भारतीय जनता पक्षाचा एकच स्वप्न आहे. पवार साहेबांना संपवण्यासाठी  देशातले सगळे लोक एकवट आहेत.  महाराष्ट्रातला लढवैया नेता संपवायचा असल्याचं स्पष्ट दिसत आहे आणि शरद पवारांना संपवण्याची भाषा चंद्रकांत पाटील करत आहेत. भाजपच्या पोटातलं ओठात आलं असल्याचंही ते म्हणाले. 


सुप्रिया सुळे यांचा दणक्यात प्रचार सुरु 


बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे प्रचारासाठी भिडल्या आहेत. त्यात अनेक ठिकाणी जाऊन त्या नागरिकांच्या भेटी घेत आहे. सोबतच प्रत्येक सोसायट्यांमध्ये जाऊनदेखील त्या सोसायटीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेताना दिसत आहे. त्यांनी आज बारामती लोकसभा मतदार संघातील पिंपरी चिंचवड मधील ताथवडे भागात त्या प्रचाराला आल्या आहेत. इथल्या नागरिकांशी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला आणि मतदानाचं आवाहन केलं आहे. 



हसन मुश्रिफ नेमकं काय म्हणाले होते?


कागलमध्ये काल (5 एप्रिल) महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका वक्तव्याने चांगल्याच भूवया उंचावल्या गेल्या आहेत. कागलमधील महायुतीचे तीन गट एकत्र येऊन मताधिक्य मिळवले, तर साक्षात परमेश्वर आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही असा ठाम विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 


इतर महत्वाची बातमी-


Mangaldas Bandal : शिरुर लोकसभेचे वंचितचे उमेदवार इंदापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला? अनेकांच्या भुवया उंचावल्या!