शिरुर, पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे  (Shirur Loksabha Constituency) वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल (Mangaldas bandal) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घेतली आहे. इंदापूरात ही भेट झाली आहे. बांदल यांनी फडणवीसांच्या भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वंचितने तिकीट जाहीर करण्याच्या एकदिवस आधी हेच उमेदवार पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करत होते. आता मंगलदास बांदल यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चांणा उधाण आलं आहे. 


नेमकं काय घडलं?


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोनाईचे प्रमुख दशरथ माने आणि  त्यांचे पुत्र प्रवीण माने यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मागच्या काही दिवसापर्यंत प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करत होते. परंतु देवेंद्र फडणवीस इंदापुरात उतरल्यानंतर थेट माने कुटुंबीयांच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रवीण माने यांच्या घरी गेले त्या ठिकाणी शिरूरचे वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल देखील उपस्थित होते. मंगलदास बांधल्यांनी मी दशरथ माने यांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मंगलदास बांदल यांनी स्पष्ट केलं आहे. 


बांदल नेमकं काय म्हणाले?


बांदल म्हणाले की,  दशरथ माने हे जिल्हापरिषदेचे नेते आहेत. त्यांच्या भेटीला मी आलो तेव्हा फडणवीसदेखील होते. मी फडणवीसांना भेटण्यासाठी आलो नाही. हा योगायोग होता. मी स्वत: शिरुर लोकसभा मतदार संघाचा उमेदवार आहे. त्यामुळे फडणवीसांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही.  बारामतीत वंचितने शरद पवारांना पाठिंबा दिला आहे आणि मी शिरुरमधून उमेदवार आहे. त्यामुळे फडणवीसांची भेट घेण्याचा कोणताही उद्देश नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


वंचित कायम भाजपला पाठिंबा देत असत, असे आरोप अनेकदा वंचित आघाडीवर होत असतात. त्यात अशा भेटी झाल्या की हे आरोप खरे ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे वंचितच्या उमेदवाराने फडणवीसांची भेट घेतल्याचं समोर येताच वंचितचा भाजपला छुपा पाठिंबा आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतोय. 


इतर महत्वाची बातमी-


Adalrao Patil Vs Vilas Lande : विलास लांडेंची नाराजी दूर, शिवाजी आढळरावांचा दावा; लांडेंची मात्र चुप्पी कायम


Pune Lok Sabha Election : धंगेकरांच्या प्रचार बैठकीत फोटोवरुन राडा; मंडपवाल्याला मारहाण,काँग्रेसमधील "नाराजी नाट्य" संपेना!