Pune NCP News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुक प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने ही स्थगिती दिली. यामधे मुंबईसह सह सर्व महत्वाच्या शहरातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी हा निर्णय लागू होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी तीन सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली होती.मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यावर शिंदे- फडणवीस सरकारने तो निर्णय रद्द करून 2017 च्या धर्तीवर प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातील महापालिकांमधे पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना लागू होणार आहे. प्रशांत जगताप यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने निकाल निर्णय दिला आहे.
नियमानुसार एखाद्या निवडणुक प्रक्रियेला थांबवता येत नाही. शिंदे सरकारने ही निवडणूक प्रक्रिया थांबवली होती. या कारणामुळे अनेक महिने निवडणुका पुढे ढकल्यात जाणार होत्या त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. पुढचा निर्णय होतपर्यंत सगळ्याच निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. निवडणूक आयोगाने देखील सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की आम्ही तात्काळ कोणतीही निवडणूक घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं आहे.
प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव
महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहे आणि त्यातच शिंदे सरकारने प्रभाग रचनेचा निर्णय बदलून महाविकास आघाडीच्या सरकारला पुन्हा एकदा धक्का दिला होता. येत्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. ती प्रभाग रचना बदलून चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. प्रभाग रचनेचा निर्णय बदला या मागणीसाठी पुण्यातील राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते दिल्लीला दाखल झाले होते.