Sunil Shelke: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) (NCP) पक्षाने राज्यभरात जनसंवाद यात्रा काढण्यास सुरूवात केली आहे. आज ही जनसंवाद यात्रा मावळमध्ये आहे. मावळ मतदारसंघात जनसंवाद यात्रेच्या सभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदारांचे आभार मानत ती गेल्या निवडणुकीवेळी जशी पाठिशी उभी राहिली तशी आताही राहिल असा विश्वास व्यक्त केला. त्यावेळी सुनील शेळकेंना (Sunil Shelke) अश्रू अनावर झाले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) पुढं येत, शेळकेंची पाठ थोपटली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. 


नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही


गेल्या निवडणुकीवेळी तुम्ही जी साथ दिली त्यासाठी कायम तुमचं काम करत राहिलं. नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही असं म्हणत ते भावूक झाले त्यानंतर उपस्थितांनी घोषणा द्यायला सुरूवात केली. यावेळी ते म्हणाले, मायबाप जनता माझं सर्वस्व आहे, मला पैशांची भूक नाही, मी पैशासाठी किंवा पदासाठी राजकारणात काम करत नाही. कोणत्या मान सन्मानाची देखील मला आवश्कता नाही. परंतु ज्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. याच विश्वासाने आयुष्यभर मी तुमच्याशी प्रामाणिक राहिन, याच विश्वासाने मी तुमची सेवा करेन. उद्या निवडणुका होतील जे व्हायचं ते होऊ द्या परंतु पद प्रतिष्ठा महत्त्वाची नसते हे मला माहिती आहे, असंही पुढे शेळके (Sunil Shelke) म्हणाले आहेत. 




मला मतदान देण्यासाठी बच्चा-कच्चानी शपथा घ्यायला लावल्या तो दिवस आजही मला आठवतो. काही मंडळी आरोप करतात, टीका करतात. मला आरोपाचं वाईट वाटत नाही, माझा बाप कष्ट करतो, माझा भाऊ कष्ट करतो, माझी बायको सावलीसारखी उभी आहे, ज्या दिवशी सुनिल शेळके तुमचे पैसे घेईल त्या दिवशी तुमची दार बंद होतील, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, तोवर माझ्यासोबत राहा असंही शेळके (Sunil Shelke) यावेळी म्हणाले आहेत. 


 सुनील तटकरेंनी सुनील शेळकेंच्या भाषणावेळी पाठ थोपटली



गेल्या निवडणुकीत मला मतदान देण्यासाठी तुम्ही जे जे केलं, ते मी कधीचं विसरू शकत नाही, असं म्हणत असताना शेळकेंना अश्रू अनावर झाले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पुढं येत, शेळकेंची पाठ थोपटली, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे तोवर कायम माझ्यासोबत राहा असंही यावेळी सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी म्हटलं आहे.