इंदापूर, पुणे : बारामती लोकसभेसाठी (Baramati Loksabha) नणंद विरुद्ध भावजय सामना रंगणार असं बोलले जात आहे. पवार विरुद्ध पवार असा बारामती लोकसभेत सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. त्यात आता अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा (Sunetra Pawar) पवार आणि सुप्रिया सुळे दोघी नणंद- भावजय प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघाचं जंग जगं पछाडत आहे तर सुप्रिया सुळेंसाठी वडिल शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत रंगताना दिसत असतानाच एक भावजय जरी विरोधात उभी राहणार असली तरी दुसरी भावजय प्रचारासाठी पुढे सरसावली आहे.
आज बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार मैदानात दिसले तर इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या गाव संपर्क दौऱ्यांमध्ये आमदार रोहित पवार यांच्या भगिनी आणि आईने प्रचाराला हजेरी लावली आहे. सुनंदा पवार आणि सई पवार यांनी हजेरी लावत सुप्रिया सुळेच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसले.
सुप्रीम कोर्टाचा निकाल पाहिला तर घडाळ्याचं चिन्ह गोठवण्याची शक्यता आहे. त्यातच हिसकावून घेतलेले काहीच कोणाला टिकवता येत नाही. ज्यांनी राष्ट्रवादी सुरु केली, वाढवली, राज्य आणि देशपातळीवर नेती त्यांच्याकडूनच घड्याळ हिसकावून घेणं सोपं आहे. मात्र ते टिकवणं तेवढच कठिण आहे. ज्याने सुरुवात केली त्याच्या हातून हिसकावून घेतलेलं घड्याळ किंंवा कोणतीही वसतू लाभत नाही, असं म्हणत सुनंदा पवार सुप्रिया सुळेंना पाठिंबा देत प्रचारार्थ मैदानात उतरल्या आहेत.
एक भावजय विरोधात तर एकीची खंबीर साथ!
आमदार रोहित पवार यांचे भगिनी सई आणि मातोश्री सुनंदा पवार यांनी आज इंदापूर तालुक्यात गाव संपर्कदौऱ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी इंदापूरातील नागरिकांना संबोधित केलं. त्यासोबतच सुप्रिया सुळेंनी केलेल्या कामाचा पाढादेखील वाचला. एकीकडे सुनेत्रा पवार मैदानात आहे. तर दुसरीकडे जावेविरुद्ध सुनंदा पवार नणंदेसोबत प्रकार करत आहे. माझे कुटुंब वगळता सर्व पवार कुटुंबिय माझ्याविरोधात प्रचार करतील, असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर थेट अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या विरोधात आणखी एक पवार उतरल्यानं अजित पवारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी-