हेडफोन लावून रेल्वे क्रॉसिंग, ट्रेनच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2016 06:08 PM (IST)
पिंपरी चिंचवड : हेडफोन कानात घालून, संगीताचा आनंद लुटत रस्त्यावर चालणं किती धोकादायक आहे, याची जाणीव अनेकांना नसते. अशाचप्रकारे हेडफोन घालून रेल्वेमार्ग ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आदित्य राम शिरसाठ हा 19 वर्षीय विद्यार्थी हेडफोन घालून रेल्वेमार्ग ओलांडत होता. त्यावेळी एक्स्प्रेसची धडक बसल्याने त्याला जीव गमवावा लागला. गुरुवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास आकुर्डी रेल्वेस्थानकावर हा अपघात झाला. आदित्य चिंचवडमधील चिंतामणी चौक परिसरात राहत होता. तो अंबीतील डी. वाय. पाटील महाविद्यालयात मेकॅनीकल इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला होता.