तळेगाव: तळेगावातल्या इंद्रायणी महाविद्यालयात भरदिवसा बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. सतरा वर्षीय चेतन पिंजणवर महाविद्यालयाच्या गेटवरच दोन तरुणांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या चेतनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला..


 

या जीवघेण्या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून मारेकरी मात्र फरार झाले आहेत. मूळचा इंदोरीचा असलेला चेतन बारावीच्या परीक्षेसाठी इंद्रायणी महाविद्यालयात आला होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा काही तरुणांशी वाद झाला होता. त्यानंतर आज ही घटना घडली आहे.

 

याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोर तरुणांचा शोध घेतला जात आहे.