Pune Bhimashankar PMPML: भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग ‘भीमाशंकर’ आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात अनेक भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी जातात. त्या सगळ्या भाविकांसाठी पीएमएमएलकडून विशेष सोय करण्यात आली आहे.  श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल कडून श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवार आणि सोमवारी भीमाशंकर येथील पार्किग ते भीमाशंकर मंदिरापर्यंत 24 तास शटल सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


या शटल सेवेकरीता पीएमपीएमएलच्या निगडी डेपोतील डिझेलवर धावणाऱ्या 12 मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  7 आणि 8 जुलै 14, 15 आणि 16 जुलै तसंच . 21 आणि 22जुलै रोजी (श्रावणमहिन्यातील प्रत्येक रविवार व सोमवार) ही शटल बससेवा भाविकांसाठी 24 तास उपलब्ध असेल. 14, 15 आणि 16 जुलै रोजी सलग असल्याने सुट्टी रविवार, सोमवार व मंगळवारी देखील शटल सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे.


निगडी डेपोतून श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी पहाटे 4 वा. या बसेस निघतील आणि सोमवारी रात्री उशिरा या सर्व बसेस निगडी डेपोमध्ये परत येतील. मिडी बसेससाठी लागणारे डिझेल भीमाशंकर येथेच सर्व्हिस व्हॅन मधून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसंच बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी ब्रेकडावून व्हॅन देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.


तरी श्रावण महिन्यात प्रत्येक रविवार व सोमवारी भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भीमाशंकर येथील पार्किग ते भीमाशंकर मंदिरपर्यंत पीएमपीएमएलच्या या शटल बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक यात्रेसाठी पीएपीएसएलकडून विशेष सेवा दिली जाते. पावसाळ्यात श्रावण महिना असतो आणि मंदिर जंगलाच्या परिसरात असल्याने नागरीकांना सहजरित्या दर्शनासाठी जाता येत नाही त्यामुळे पीएपीएसएलकडून ही सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारीच्या वेळी देखील पीएपीएसएलकडून वारकऱ्यांसाठी विशेष सेवा देण्यात आली होती.