Shivneri bees Attack: शिवनेरी किल्ल्यावर आज (20 April) आग्या मदमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला. या घटनेत अनेक पर्यटक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी विकेंड असल्यामुळे किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. याच गर्दीच्या वेळी मधमाशांनी हल्ला केल्याने एकच घबराट उडाली. काही दिवसांपूर्वी किल्ले शिवनेरीवर शिवप्रेमींवर मधमाशांच्या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले होते. गेल्या दीड महिन्यातला हा तिसरा हल्ला असून आता शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेवर वनविभागाकडून ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे.(Pune News)

अनेकदा गडावर जाणाऱ्या पर्यटकांकडून मधमाशांना डिवचण्याचा प्रकार घडल्याचेही काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्याची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, वारंवार मधमाशांच्या हल्ल्यामुळे आता पर्यटकांची सुरक्षा चिंतेचा विषय ठरतेय.

उष्णतेच्या पाऱ्याने मधमाशा आक्रमक

सध्या उष्णतेचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे मधमाशांचा स्वभाव अधिक आक्रमक झाल्याने हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Temperature Rise) शिवनेरीवर सातत्याने मधमाशांचे वाढते हल्ले लक्षात घेता पर्यटकांना किल्ल्यावर येताना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. मधमाशांच्या हल्ल्यामुळे शिवजयंतीनिमित्त गडावर मोठी गर्दी होती.यावेळीही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढवला होता. यात 47 जण जखमी झाले होते.यानंतर काही काळासाठी शिवनेरी गड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, आज सकाळी विकेंड असल्याने शिवनेरी गडावर पर्यटकांची गर्दी होती.तेवढ्यात मधमाशांचे मोहोळ उठले. आग्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. यात लहान मुलांसह महिला व तरुण पर्यटकांचा समावेश आहे.गेल्या दीड महिन्यात हा तिसरा हल्ला आहे. (Shivneri Fort)

शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांच्या वसाहती अनेक वर्षांपासून कायम आहेत. काही बेशिस्त, हुल्लडबाज पर्यटकांमुळे मधमाशांना त्रास होतो. यामुळे दरवर्षी प्रामुख्याने उन्हाळ्यात मधमाशांचा पर्यटकांवरील हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमध्ये शेकडो पर्यटक, लहानमुले गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेक परदेशी पर्यटक देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर वनविभागाच्या उपाययोजनांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पर्यटकांनी अधिक काळजी घ्यावी, शांतता राखावी आणि किल्ल्यावर मदमाशांचे अस्तित्व असलेल्या भागांत जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा:

Sharad Pawar on Raj and Uddhav Thackeray : राज अन् उद्धव ठाकरेंच्या 'मनसे' मलोमिलनाची रंगली चर्चा; शरद पवार अवघ्या एका वाक्यात काय म्हणाले?