Pune shiv Sene News: शिवसेनेने महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात हालचाली सुरु केल्या आहेत. पुण्यात देखील या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती केली. शिवसेनेकडून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 62 किलोचा मोदक अर्पण केला. या महाआरतीच्या वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


1 ऑगस्टला एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्या दरम्यान ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करणार आहे, अशी माहिती मिळताच ठाकरेंच्या शिवसेनेने लगेच आज महाआरती केली आहे. त्यामुळे दोन्ही गटात राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे. दरवर्षी निलम गोऱ्हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गणपतीला मोदक अर्पण करून आरती करतात. आरती ही राजकीय नाही आणि त्याचा 1 ऑगस्टच्या आरतीशी संबंध नाही, असं शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे.


बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि सध्याची शिवसेना यात फार फरक आहे. त्यांची शिवसेना तत्वांवर चालत होती. विचारांवर चालत होती. सध्याच्या शिवसेनेचे तत्व आणि विचार बाळासाहेबांच्या विचाराशी संबंंधित नाही यामुळे एकनाथ शिंदे वेगळे झाले होते. हिन्दुंची विचारधारा माणनाऱ्या भाजपसोबत त्यांनी हातमिळवणी केली. सध्याचंं राजकारण हे धर्मावर चालणारं राजकारण आहे. धर्माचा विचार आणि तत्व जपणारं राजकारण आहे. त्यामुळे धार्मिक विचारांचं राजकारण आता मंदिरापर्यंत पोहोचलं आहे. अनेक ठिकाणी जाऊन दर्शन तर कुठे महाआरत्या करत विचारधारेचा प्रचार सुरु असल्याचं चित्र आहे. 


पुण्यात महाआरतीमुळे तणाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेना गटाने आपली महाआरती उरकुन घेतली आहे. त्यामुळे शहरातील राजकारणात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे नुकतेच एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर मावळात शिवसेनेच्या पडझडीस आता सुरवात झाली आहे. त्यांच्यासोबत आता नेमकं कोण कोण शिंदे गटात सामील होणार?, याची शिंदे गटाला उत्सुकता आहे.