शिरुर, पुणे : शिरूर लोकसभेतील अजित पवार गटाचे (Ajit Pawar) उमेदवार शिवाजी आढळराव (Adhalrao Patil) हे डमी आहेत की डॅडी आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी आढळराव हे डमी उमेदवार आहेत. म्हणून मी त्यांच्यावर फार बोलत नाही, अशी खोचक टीका केली. तर आढळरावांनी या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे, असं म्हणत आढळरावांनी पलटवार केला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना तिकीट देणार होते. त्यामुळं आढळराव पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते. अशी खिल्ली कोल्हेंनी उडवली होती. त्यावेळी अशी विधानं करण्यात कोल्हे आणि संजय राऊतांमध्ये साम्य आहे. असं म्हणत आढळरावांनी कोल्हेची टर उडवली होती. तो विषय संपतो न संपतो डमी आणि डॅडी उमेदवारावरून कोल्हे आणि आढळरावांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. 


अमोल कोल्हे म्हणाले की, भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर, छगन भुजबळांना शिरुर मधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांनी केला. त्यानंतर आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले. त्यावरून डॉ. कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आलेच नाहीत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी काय सभा घेणार नाही. मी फक्त रोड शो करून जाईल. असं नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावरूनच स्पष्ट होत आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत.


'मी डमी नाही तर मी डॅडी उमेदवार आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी समजून घ्यावं की डमी ते असतील आणि डॅडी मी आहे. साधारण पाहता अमोल कोल्हेंनी शिरुर मतदार संघातील अनेक गावंं दत्तक घेतली आहे. या दत्तक घेतलेल्या गावात सोयी सुविधा नाही. मात्र मी कोणालाही न सांगता माझ्या संस्थेमार्फत अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा करतो आणि गावात सोयी सुविधा देतो. गावं नुसते दत्तक घेऊन होत नाही सोयी सुविधादेखील पुरवाव्या लागतात. त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातदेखील मी पाणी पुरवठा  करत आहे', असं आढळराव पाटील म्हणाले.


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : कोयता गँगची दहशत संपेना! बिबवेवाडीत 10 ते 15 गुंडानी कोयत्याने गाड्या फोडल्या, कोयता गॅंगला रोखण्यात पुणे पोलीस अपयशी?