पुणे: मुंढवामधील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीकडून (Sheetal Tejwani) ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती समोर आली आहे. तेजवाणीच्या (Sheetal Tejwani) बँका खात्यात ३०० कोटी रुपयांचे व्यवहार झालेले दिसत नाही. तिने ही रक्कम रोखीने घेतली का? किंवा हा व्यवहार नेमका कसा झाला, याबाबत तिच्याकडून पोलिसांची दिशाभूल केली जात आहे.जमिनीचा कब्जा हक्काचा सारा भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात भरलेला ११ हजार रुपयांचा डीडी कोणाच्या सांगण्यावरून भरला हे तेजवाणी हिने अद्याप सांगितलेले नाही. तिच्या घरझडतीमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्रे मिळून आलेले नाहीत. त्यामुळे तिचे इतर ठिकाणी घर किंवा कार्यालय असण्याची पोलिसांना दाट शक्यता आहे.(Sheetal Tejwani)

Continues below advertisement

Pune Land Case: तिने ही रक्कम रोख पध्दतीने घेतली का?

तर जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीच्या बँक खात्यात ३०० कोटी रुपयांचे व्यवहार झालेले दिसून आलेले नाहीत. तिने ही रक्कम रोख पध्दतीने घेतली का? किंवा हा व्यवहार नेमका कसा झाला, याबाबत ती पोलिसांची दिशाभूल करत आहे. तिचा 'अमेडिया इंटरप्रायझेस एलएलपी कंपनी'शी कसा संपर्क झाला. तिने कोणाच्या ओळखीने जमिनीचा व्यवहार केला, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी काल (गुरुवारी ता. ११) न्यायालयाला दिली आहे.

शीतल तेजवानी (४४ वर्षे, मूळ रा. ३०५, ३ रा मजला, तुलसियानी चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई, सध्या राहणार बी ९०१, ऑक्सफर्ड हॉलमार्क, लेन नंबर ७, कोरेगाव पार्क) हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तीन डिसेंबर रोजी अटक केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, जमिनीच्या कब्जा हक्काचा सारा भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात भरलेला ११ हजार रुपयांचा डीडी कोणाच्या सांगण्यावरून भरला, हे तेजवानी हिने अद्याप पोलिसांना चौकशीमध्ये सांगितलेले नाही. तिच्या घरझडतीमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे तिचे इतर ठिकाणी घर किंवा कार्यालय असण्याची शक्यता असून २ पैकी एक सीम वकिलाच्या नावे आहे.

Continues below advertisement

Pune Land Case: तेजवाणीच्या कोठडीत १५ डिसेंबरपर्यंत वाढ

त्याचबरोबर शीतल तेजवानीकडून २००६ मधील ३३ नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र व २००८ मधील ४५ रिव्होकेबल कुलमुखत्यार पत्र हस्तगत करण्यात आलेली आहेत. २००६ मधील कुलमुखत्यारमध्ये वतनदार यांचे १४४ वारसदारांची नावे समाविष्ट आहेत तर २००८ च्या ४५ रिव्होकेबल कुलमुखत्यारामध्ये वतनदार यांचे २३९ वारसदारांची नावे समाविष्ट आहेत. तिने केलेल्या दस्तामध्ये २७२ वारसदार यांच्यावतीने कुलमुखत्यार म्हणून खरेदी खत केलेले आहे. त्यामुळे तिने संपूर्ण २७२ वारसदार यांचे कुलमुखत्यार दिलेले नाही. उर्वरित कुलमुखत्यार पत्र तिने कुठे दडवून ठेवली आहेत? त्याचं काय केलं? हे तपासून त्या हस्तगत करण्यासाठी पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याचा युक्तीवाद वकिल अमित यादव यांनी केला.