“मान्सून लांबला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलंय. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ लोकांनी काल सांगितले की, येत्या चार दिवसा म. महाराष्ट्र, प. महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पडेल. त्यांचा हा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन.”, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, माझं कर्ज माफ झाले, असं कुठल्या शेतकऱ्याने बँकेला पत्र दिलंय, असं चित्र दिसलं नाही, असे म्हणत शरद पवारांनी कर्जमाफीवर असमाधानी असल्याचे सांगितले.
जागतिक मधमाशी दिवस व कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज शरद पवार बारामतीत आले होते. यावेळी मधूसंदेश प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट शेतकऱ्यांना पवारांच्या हस्ते पुरस्कारही देणात आले.
व्हिडीओ :